ईशान्य भारतातली त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय ही तीन राज्ये आणि ४ जागांवरील विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले आहेत. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले. तर मेघालयात सत्ताधारी नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.
त्रिपुरा विधानसभा निवडणूक :- ६० जागांच्या त्रिपुरा विधानसभेत भाजप-३२ व मित्रपक्ष आयपीएफटी-१, सीपीआय (एम)-११ तसेच काँग्रेस-४, त्रिपुरा मोथा पार्टी-१२ जागांवर विजय मिळवला आहे.
नागालँड विधानसभा निवडणूक :- मेघालयमध्ये ६० जागांसह भाजपने एक जागा बिनविरोध जिंकली असून ५९ जागांवर मतदान झाले. एकूण ५९ जागांच्या ट्रेंडनुसार राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी २६, भाजप १३ जागा, काँग्रेस ५ जागा, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), नागा पीपल्स फ्रंट, नॅशनल पीपल्स पार्टी प्रत्येकी ३ जागा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दोन, जनता दल (युनायटेड) एक आणि अपक्षांनी ४ जागा जिंकल्या आहेत.
मेघालय विधानसभा निवडणूक :- मेघालय विधानसभेच्या ६० जागांपैकी ५९ जागांसाठी मतदान झाले. मेघालयातील सोह्योंग (एसटी) जागेवर उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान पुढे ढकलण्यात आले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत ट्रेंडनुसार नॅशनल पीपल्स पार्टी आघाडीवर 26, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी १०, व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी ५, तृणमूल काँग्रेस ५, काँग्रेस ४, भारतीय जनता पार्टी ३, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी २, अपक्ष २ ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
Join Our WhatsApp Community