एकनाथ शिंदेंच्या पाठीशी कोण? शरद पवारांचा रोख कुणाकडे

148

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचे शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यामुळे एकप्रकारे शरद पवार यांनी भाजपवर आरोप केल्याचेच म्हटले जात आहे.

भाजपकडे इशारा

एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत आपल्याला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे, असे सांगत शरद पवार यांनी देशातील प्रमुख सहा राष्ट्रीय पक्षांची नावे वाचून दाखवली. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा उल्लेख करत यापैकी कोणत्या पक्षांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना आहे हे वेगळं सांगण्याची गरज नसल्याचे सांगत शरद पवार यांनी भाजपकडे इशारा केला आहे.

(हेही वाचाः मविआबाबत राऊतांच्या वक्तव्याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारणार – अजित पवार )

सरकारची ताकद विधानसभेत कळेल

सरकार अल्पमतात आहे की नाही हे याचं उत्तर विधानसभेत मिळेल. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव होत बहुमत सिद्ध झाल्यावरच याची माहिती आपल्याला मिळेल. अशी स्थिती यापूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली आहे. पण यावर मात करुन हे सरकार बहुमत सिद्ध करेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार चालू आहे, हे संपूर्ण देशाला कळेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांनी दिले उत्तर

जे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासाबत गेले आहेत त्यांचं म्हणणे आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात नाराजी आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. त्या आमदारांनी इथे येऊन सांगावे आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे राऊत यांनी म्हटले आहे. हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये सांगितल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः राऊतांच्या विधानावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत नाराजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.