मृत गोविंदा प्रथमेश परबच्या कुटुंबाला ९ लाख ९९ हजारांची मदत

101

गोविंदा पथकात दुखापत होऊन मृत्यू झालेल्या प्रथमेश परब याच्या कुटुंबाला भाजपाने काढलेल्या विम्याचे ९ लाख ९९ हजार रूपये बुधवारी सुपुर्द करण्यात आले.

(हेही वाचा – प्रभागरचनेसंबंधी शिंदे-फडणवीस सरकारच्या अध्यादेशावर उच्च न्यायालयाचा धक्कादायक आदेश)

भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने दरवर्षी जवळपास ५० हजार गोविंदांचा दि. ओरियंट इन्शुरंन्स कंपनी मार्फत विमा उतरविण्यात येतो. यावर्षी प्रथमेश परब याचे उत्सवाच्या काळात अपघाती निधन झाले. भारतीय जनता पार्टी तर्फे ओरियंटल इन्शुरंन्स कंपनीने दिवंगत प्रथमेश याच्या नावे असलेल्या विम्याचे रुपये ९ लाख ९९ हजार रुपये पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतले.

खा. मनोज कोटक आणि भाजपा कोकण विकास आघाडी अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी बुधवारी प्रथमेशच्या भांडूप येथील घरी त्याच्या वडिलांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. प्रथमेशच्या जाण्याने कुटुंबाची झालेली हानी पैशाने भरून निघणारी नाही. पण आम्ही या कुटुंबासोबत आहोत एवढा धीर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.