Lok Sabha Election 2024 : मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार

मोदी सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.

181
Lok Sabha Election 2024 : भाजपचा बॉलिवूड-क्रीडा क्षेत्रातील चेहऱ्यांवर डोळा
Lok Sabha Election 2024 : भाजपचा बॉलिवूड-क्रीडा क्षेत्रातील चेहऱ्यांवर डोळा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन ‘महाविजय २०२४’ अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयात बुधवारी (१० जानेवारी) पार पडली. मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. (Lok Sabha Election 2024)

मुंबई भाजपाने (BJP) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. याच अनुषंगाने मुंबई लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्याकडे असून अतुल भातखळकर संयोजक, तर संजय उपाध्याय, आमदार सुनील राणे, अमित साटम आणि योगेश सागर यांना सह-संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय विविध प्रकारचे ३६ विभाग तयार करण्यात आले असून, त्याची जबाबदारी अंतर्गत पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – BMC : मुंबई महानगरपालिकेचे ‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ नाटक अव्वल)

लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू

मोदी सरकारने (Modi Govt) अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तसेच संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. बुथ समित्या अधिक सक्षम करून पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करुन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे. बुधावारी प्रथम संयोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर या समितीच्या कोअर गृपने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघाचा त्या मतदार संघाचे खासदार, आमदार आणि जिल्हा अध्यक्ष, महामंत्री यांच्याकडून आढावा घेतला. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.