“धरण उशाला आणि कोरड घशाला”, म्हणत भाजपचा जालन्यात ‘जल आक्रोश मोर्चा’

197

औरंगाबादनंतर बुधवारी जालन्यातील पाणी प्रश्न तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात पाणी प्रश्नासाठी भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपच्या नेत्यासह जालन्यातील नागरिकांचा मोठा सहभाग होता. यावेळी पाण्याच्या प्रश्नावरून सगळ्या मराठवाड्याची स्थिती तशीच आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

काय म्हणाले फडणवीस

महाविकास आघाडी सरकारला सामान्य नागरिकांच्या आक्रोशाची दखल घ्यावी लागेल, जे दखल घेत नाही ते सरकार जागेवर राहत नाही. अडीच वर्ष सत्तेत असताना १२९ कोटींचे काय केले, का पाणी जालनेकरांना पाण्यासाठी तरसावे लागत आहे, याचे उत्तर महाविकास आघाडीने दिले पाहिजे. तसेच त्यांच्या नाकार्तेपणामुळे पाणी देता येत नाही आणि तेच असे प्रश्न विचारत असल्याची टीका फडणवीसांना महाविकास आघाडीवर केली. यासह फडणवीस असेही म्हणाले की, या मोर्चानंतर सरकारला जागे व्हावेच लागेल.

(हेही वाचा – “अयोध्या दौरा हा राजकारणाचा विषय नाही तर…”)

दानवेंचा शिवसेनेला इशारा

रावसाहेब दानवे यांच्यामुळे १२९ कोटी रूपये जालन्याला मिळाले आहेत. किमान सरकार जागे झाले आणि मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये आले. पाणी प्रश्नावर भाजप काय उपाय करणार, सरकारकडे पैसे आहेत, असे उत्तर जालन्यातील पाणी टंचाईवर फडणवीस म्हणाले. निधी आम्ही दिला. या निधीचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला केला. आमचे उत्तरदायित्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना आम्ही ते पैसे दिले. आमचे मते चोरीला गेले आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीत शिक्षा देऊ, असा इशारा दानवे यांनी शिवसेनेला दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.