महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत, देशात फक्त भाजपच राहणार – जेपी नड्डा

150

शिवसेनेचे खासदार, नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. यासह राज्यात शिवसेनेचा अंत होत असून देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही, जो भाजपला पराभूत करू शकेल. बिहार येथील १६ जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते.

(हेही वाचा – IRCTC New Plan : स्वस्त मस्त रेल्वे! आता जेवणासाठी नका देऊ जास्तीचे पैसे, पहा संपूर्ण दरपत्रक )

काय म्हणाले नड्डा?

यावेळी नड्डा म्हणाले की, भाजप हा विकासाचा समानार्थी शब्द आहे. भाजपच्या वाढत्या स्वीकारार्हतेचा दावा करून ते म्हणाले की, आता देशात एक राष्ट्र एक कायदा आहे. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना मूल्य शिकवते. आम्ही वैचारिक पार्श्वभूमी घेऊन उभे आहोत, असे ते म्हणाले. जर आम्हाला कल्पना नसती तर आम्ही एवढा मोठा लढा लढला नसता. आज दोन-तीन दशके इतर पक्षात राहिलेले अनेक लोक पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. काम करताना देश बदलण्याची ताकद असेल तर ती भाजपमध्येच आहे, हे या सर्वांना समजल्याचे नड्डा यांनी यावेळी सांगितले.

देशातील अनेक राज्यांतून काँग्रेस आता संपुष्टात येत असून, भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. या ठिकाणाहून करोडो कार्यकर्ते जन्माला येतील. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष हा एक कौटुंबिक पक्ष आहे, बिहारमध्ये आम्ही कौटुंबिक पक्ष असलेल्या राजदशी लढत आहोत. नवीन बाबूंचा पक्ष हा ओडिशातील वन मॅन पार्टी असून, महाराष्ट्रात आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली शिवसेनाही एक कौटुंबिक पक्ष आहे. काँग्रेस हा भाऊ-बहिणींचा पक्ष झाला असून, लढा बांधिलकीतून असतो, बांधिलकीतून ताकद जन्माला येते. भाजप हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेला पक्ष असल्याचेही त्यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.