BJP : केशव प्रसाद मौर्य उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता?

103
BJP : केशव प्रसाद मौर्य उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता?

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेतील अपयशासाठी भाजपा नेते एकमेकांना जबाबदार धरण्यात आघाडीवर आहेत. एवढेच नव्हे तर पक्षातील आमदार उघडपणे नाराजी बोलून दाखवीत आहे. यातच पक्षांच्या संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यावर भाजपा पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. (BJP)

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. ८० पैकी केवळ ३३ जागांवर भाजपाचा विजय झाला. त्यामुळे उत्तर प्रदेशात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्याच्या हालचाली केंद्रीय नेतृत्वाने सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद असलेले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (BJP)

(हेही वाचा – Lokmanya Smruti Pratishthan च्या वतीने लोकमान्य टिळकांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन)

मौर्य यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची शक्यता

२०२७ मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये केशव प्रसाद मौर्य हे होते. ते २०१६ मध्ये प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अचानक योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली होती. ओबीसी चेहरा म्हणून मौर्य यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उत्तर प्रदेशमधील पराभवाविषयीचे विश्लेषण केले. नंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट भूपेंद्र चौधरी आणि केशव प्रसाद मौर्य यांनी घेतली. तब्बल एक तास त्यांनी नड्डांसोबत चर्चा केली. (BJP)

केशव प्रसाद मौर्य हे ओबीसी नेते आहेत. तर भूपेंद्र चौधरी हे जाट समुदायातून येतात. जयंत सिंह चौधरी हे भाजपासोबत आल्याने जाट समुदाय भाजपासोबत राहिल, असा आत्मविश्वास केंद्रीय नेत्यांना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने दलित नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदी संधी द्यावी, असे एका गटाचे म्हणणे आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.