“राऊतांचा मित्रांना हाताशी धरुन १०० कोटींचा घोटाळा”, काय म्हणाले सोमय्या?

100

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं काही थांबत नाही. आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांसह कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर १०० कोटींच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा – शाळा सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश, येत्या सोमवारपासून…)

संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजीत पाटकर यांच्याविषयी आता नवी माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांना शहरातील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट दिले होते. सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनीच्या माध्यमातून हे कंत्राट मिळवले होते. या प्रकरणानंतर ईडीने सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यावेळी मुंबईतील कोव्हिड केंद्रांविषयीची कागदपत्रे जप्त केल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे आता ‘ईडी’ काय कारवाई करणार याकडे विरोधकांचे लक्ष लागून राहिले आहेत.

सोमय्यांचा राऊतांवर घाणाघात

लाइफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाने भागीदारी फर्म स्थापन केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी राऊत यांच्यावर केला. मुंबईच्या दहिसर वरळी NSCI महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड कोविड-केअर सेंटरमध्ये काम मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तक्रार केली असून चौकशीची मागणीही केली आहे. सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले जायचे. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले

असाही केला होता आरोप

याआधीही किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन कंपनीत भागीदारी केल्याचा आरोप केला होता. राऊत यांची महाराष्ट्रातील बडे उद्योगपती अशोक गर्ग यांच्या मॅग पी ग्लोबल लिमिटेड या वाईन कंपनीत भागीदारी असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. या व्यवसायात त्यांची मोठी गुंतवणूक आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी या कंपनीत संचालक पदावर आहेत. वाईन व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे मॉल्स आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाला संजय राऊत समर्थन देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.