“मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत:च्या आईचे नाव…” सोमय्यांचा गंभीर आरोप!

120

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाला डायरी सापडली यात संशयास्पद नोंदी आढळून आलेल्या आहेत. या डायरीत ‘मातोश्री’ चा उल्लेख करण्यात आलेला आहे. मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ, तर दुसऱ्या नोंदीत गुढीपाडव्याला २ कोटींचे गिफ्ट अशी नोंद करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांच्या मातोश्री म्हणजे नक्की कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खळबळजनक ट्वीट केले आहे.

( हेही वाचा : बडतर्फ एसटी कामगारांना पुन्हा घेणार सेवेत…पण एकच अट! )

किरीट सोमय्यांचे ट्वीट

“हद्द कर दी, यशवंत जाधवांनी घोटाळा लपविण्यासाठी आणि वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव द्यावे, याचे वाईट वाटते. ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल !!??” असे ट्वीट करत किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

तर दुसरीकडे या डायरीतील उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला असला तरी जाधव हे शिवसेनेचे नेते असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत येत्या आठवड्यापासून मुंबईत आंदोलन केले जाणार असल्याचे भातखळकरांनी सांगितले. कोरोनाकाळात ३८ मालमत्ता खरेदी करुन ३०० कोटी रुपये यशवंत जाधव यांनी मिळवले आहेत. जनतेचे लुटलेले पैसे मुंबईकर जनतेला परत मिळाले पाहिजेत, असे भातखळकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.