मुंबई महापालिकेसाठी काम करणाऱ्या ३५ कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई २५ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आली होती. यामध्ये अनेक संवेदनशील पुरावे विभागाचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व कंत्राटदारांचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्याशी संबंध असल्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यांच्या घरातून दोन कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी ४०० कोटींच्या घोटाळ्यात कोणाचा सहभाग होता, यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे.
असे आहे किरीट सोमय्या…
Shivsena Yashwant Jadhav BMC Contractors, Income Tax Raids. More than ₹400 crores scam. Involvement of 3 Leaders, 3 BMC Officials & 5 Contractors@BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/R7kJft1Q4B
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 3, 2022
या घोटाळ्यात कोणा-कोणाचा सहभाग!
मुंबई पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांना कंत्राट देताना घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली असून चारशे कोटींच्या घोटाळ्यात तीन नेते, तीन मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि ५ कंत्राटदारांचा देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यशवंत जाधव यांच्या घरी लगातार चार दिवसांपासून आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गैरव्यवहार आणि मनी लॉड्रिंगचा आरोप यशवंत जाधव यांच्यावर करण्यात येत आहे. या छापेमारीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे आणि २ करोड रुपये रोख जप्त करण्यात आली असल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान ४ दिवसांच्या कारवाईनंतर यशवंत जाधव यांनी लढूया, जिंकूया आणि एकदिलाने भगवा फडकवूया अशी पहिली प्रतिक्रिया दिली होती.
छापेमारीदरम्यान ,जाधवांची चौकशी सुरु
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी छापेमारी केली. छापेमारीदरम्यान यशवंत जाधव यांची चौकशी सुरु करण्यात आली. अधिकाऱ्यांनी घरातून काही इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे जप्त केले आहेत. तसेच शनिवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ करोड रुपये जप्त केले आहेत. रविवारी पुन्हा महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community