भाजप नेते किरीट सोमय्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ एक प्रकरण नाही तर एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचे सोमय्या म्हणाले. किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांनी चौकशी केली. तसेच शनिवारी पुन्हा चौकशीला बोलावण्यात आले होते. सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आज, रविवारी सोमय्यांनी कागदपत्र जमा केली. पेडणेकर यांनी कोविड काळात घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी करत पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
(हेही वाचा – #BoycottCadbury का होतंय ट्रेंडिंग? कॅडबरीच्या जाहिरातीशी पंतप्रधान मोदींचा काय संबंध?)
काय म्हणाले सोमय्या…
एसआरए घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार केली होती. पण उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी झाली नाही, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी या प्रकरणात आरोप केला आहे की, ठाकरे सरकारला पुरावे दिले होते. मात्र ठाकरेंच्या सीएमओकडून दबाव आल्याने घोटाळ्याची चौकशी झाली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बोलणं झाल्याचेही सोमय्यांनी सांगितले. पेडणेकर यांच्यावर सोमय्यांनी तक्रार दाखल केली असून पेडणेकरांवर सहा ठिकाणी तक्रार दाखल असल्याचे सोमय्यांनी सांगितले.
सोमय्यांनी पुढे असेही म्हटले की, या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे, एसआरएनं चौकशी सुरु केली आहे. यासह एसआऱएच्या सीईओंशी बोलल्याचेही त्यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर पेडणेकर यांनी पैसे कमवून घोटाळा करून बेनामी संपत्ती कमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच भावाच्या नावावर किशोरी पेडणेकर यांनी फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community