महाराष्ट्रात आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे. तर दूसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक आणि पोलीस महासंचालक यांना विनंती आहे, की त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेऊन घोडेबाजार मांडणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो गुन्हा आहे. अशाप्रकारे आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
बेईमान कोण? सोमय्यांचा सवाल
घोडेबाजारावरून सोमय्यांनी लक्ष्य करत म्हटले की, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की, त्यांच्या वर्तमानपत्रात आलेली माहिती त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेला द्यावी. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घ्यावी, सामनाच्या संपादकांची प्रतिक्रिया घ्यावी आणि तशी कारवाई करावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी केली. तसेच बेईमान कोण शिवसेनेचे आमदार की नेते, असेही पुढे ते म्हणाले.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांना कोरोना; ट्विटवर आवाहन करत म्हणाले, सर्वांनी काळजी घ्या!)
सचिन वाझे बोलू लागले तर उद्धव ठाकरेंना भिती वाटते, मेरा क्या होगा? तेरा क्या होगा कालिया? सचिन वाझेला सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्याची मंजूरी दिली असल्याने जर वाझेंनी सांगितले, की दापोलीच्या रिसॉर्टचे पैसे कोणी दिले, सचिन वाझेच्या वसुलीमधून कॉन्टॅक्टरचे पैसे दिले, असे जर वाझेंनी सांगितले तर तुमचे काय होणार उद्धव ठाकरे, असा सवाल उपस्थित करत सोमय्यांनी उद्धव ठाकरेना टोला लगावला आहे.
Join Our WhatsApp Community