उद्धव ठाकरेंवर टीका करताना सोमय्यांची जीभ घसरली; म्हणाले, “असा *#@#* मुख्यमंत्री..”

103

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुरूवारी ईडीने धाड टाकली. अनिल परबांसह त्यांच्या निकटवर्तीयांवरही ईडीकडून छापे टाकण्यात आले. ईडीकडून कारवाई सुरु असलेल्या दापोलीतील रिसॉर्टशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा परब यांनी केला. दरम्यान, परब यांच्या या दाव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री परब यांच्यावर निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करताना सोमय्या यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा – “…तर वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही?”, शिवसेनेचा भाजपला सवाल)

काय म्हणाले किरीट सोमय्या

25 कोटींचा रिसॉर्ट अनिल परब यांचा आहे, उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्याचं नाटक केलं, आता अनिल परब नाटक करत आहेत, यांना नोबेल मिळालं पाहिजे. असा *#@#* मुख्यमंत्री महाराष्ट्राने याआधी पहिला नाही. अनिल परब आता सुटणार नाहीत, त्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. हा पैसा वाझेचा आहे की खरमाटेचा आहे हा सवाल आहे. आता यशवंत जाधव यांची सुरुवात झाली, गुरूवारी प्रधान डीलर या विरोधात कंपनी मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे, त्यांच्या पूर्ण परिवार विरोधात कारवाई सुरू झाली आहे. त्यांनतर उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा नंबर लागणार आहे, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

अनिल परब म्हणतात, तो मी नव्हेच…

सोमय्या असेही म्हणाले, मंत्री अनिल परब दापोलीतील रिसॉर्ट माझ्या मालकीचे नसल्याचे सांगतात. दापोलीतील ते रिसॉर्ट सदानंद कदम यांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रिसॉर्ट दुसऱ्याच्या मालकीचे असताना डिसेंबर २०२० मध्ये परब यांनी या जागेचा मालमत्ता कर का भरला, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. माणूस एव्हढा नाटकी बनू शकतो, हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिले आहे. यांना नोबेल मिळाले पाहिजे. अनिल परब म्हणतात तो मी नव्हेच. त्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. १२ मुद्दे मी काढले आहेत. त्याची उत्तर अनिल परब का देत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.