महाविकास आघाडी सरकारवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले आहेत. बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी आयुष्य आणि धर्मही विकला. त्यामुळे ते कितीही आरोप झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली.
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा घेतला नाही
श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून नैतिकतेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याविषयी किरीट सोमय्या यांना विचारण्यात आले असता सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच फटकारले. ते पुढे असेही म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी याकरताच नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही. भविष्यात आपले घोटाळेही बाहेर येतील आणि आपल्या राजीनाम्याची मागणी होईल, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना होती. त्यामुळेच देशद्रोह्यांना टेरर फंडिग करणाऱ्या मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
(हेही वाचा – धक्कादायक! मुंबईत रोज ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण)
घोटाळेबाजांपासून महाराष्ट्राला मुक्त करायचे आहे
महाराष्ट्रात जे घोटाळे झालेत सुरू आहेत, महाराष्ट्राची जनता हे चालू देणार नाही. आमची लढाई ही सरकार पाडण्याकरता किंवा कोणाचा राजीनामा घेण्याकरता नाही. त्यामुळे भाजपची लढाई ही महाराष्ट्राला घोटाळेबाजांपासून मुक्त करण्यासाठी असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसांत आणखी सहा छोटे मोठे घोटाळे बाहेर येणार असून तपास यंत्रणांची कारवाई होणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी केले. एवढा पैसा कुठून आला, महापालिकेच्या कंत्राटदारांकडून आले की दोन वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यातून पैसे जमा झाले याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव यांनी देण्याची मागणीदेखील सोमय्यांनी केली आहे.