भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर संदर्भात आरोप केले होते. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप शनिवारी सोमय्या यांनी केला होता.
काय केला सोमय्यांनी दावा
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर प्रकरणातील त्या चहावाल्याचा किरीट सोमय्यांनी शोध घेतला आहे. त्या चहावाल्याच्या शोधात सोमय्या मुंबईच्या केईएम रुग्णालयासमोरील एका हॉटेलमध्ये शनिवारी पोहोचले. यावेळी सोमय्यांनी हॉटेलची देखरेख केली. यावेळी त्यांना खळबळजनक दावा देखील केला आहे. ते म्हणाले, ‘पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे 100 कोटींचे कंत्राट मुंबईतील सह्याद्री हॉटेल मालकाला देण्यात आले. राजीव साळुंखे यांच्या नावे हॉटेल आहे. ठाकरे सरकारने जम्बो कोविड सेंटरप्रकरणी घोटाळा केला आहे.’
(हेही वाचा- काय सांगताय! मुंबईतील उंदिरही कोट्यवधींचे…)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका चहावाल्याला जम्बो कोविड सेंटरचे 100 कोटींचे कंत्राट दिले असा आरोप सोमय्यांनी केला. पुण्यातील कंत्राट मुंबईतील एका चहावाल्याला दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांवर सोमय्यांनी निशाणा साधला आहे.
परळ मधील या हॉटेलला सोमय्यांची सरप्राईज व्हिजिट
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या सह्याद्री हॉटेलमध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. परळमधील या चहावालाच्या सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचले. यानंतर त्यांनी हॉटेल मालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांनी भेट दिली त्यावेळी हॉटेलचा मालक तेथे उपस्थितीत नव्हता त्यामुळे त्याच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. यापार्श्वभूमीवर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ते निघून गेले.
चहावाल्याला कंत्राट दिलं
सोमय्या बोलतना असेही म्हणाले, चायवाला, दारुवाला हे उद्धव ठाकरेंचे कारनामे आहेत. वाईन कंपनीसाठी पॉलिसी बदलली गेली. संजय राऊत पार्टनर बनले. जी कंपनी अस्तित्वात नाही त्यांना कंत्राट दिलं. एका चहावाल्याला कंत्राट दिलं. कोविड कंपनी कधी स्थापन झाली नाही त्यांना कंत्राट कसं दिलं गेलं? असा सवाल त्यांनी केला.
Join Our WhatsApp Community