महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात आता फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. यासह अनिल देशमुख, नवाब मलिकांनंतर आता पुढे कोणत्या मंत्र्याचाच नंबर आहे? यासंदर्भात सोमय्यांनी सूचक ट्विट करून इशारा दिला आहे.
सोमय्यांच्या टार्गेटवर आता अनिल परब
दरम्यान, आता किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह झाले असून यंदा त्यांच्या टार्गेटवर परिहवन मंत्री अनिल परब असल्याचे समजतेय. सोमय्यांनी याआधीही अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची नावे समोर आणली होती. बजरंग खरमाटे नावाचा आरटीओ अधिकारी परबांचा ‘वाझे’ आहे, असे सोमय्यांनी म्हटले होते. आता सोमय्यांनी आणखी एक ट्वीट करत महाविकास आघाडीतील चौथ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
(हेही वाचा – “‘ग्रामस्वराज’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था महत्त्वाची” )
काय आहे सोमय्यांचे ट्वीट
सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे कोकणात अनधित बंगले असल्याचा आरोप केला होता. यासोबत किनारपट्टी भागात अनिल परबांचे बंगले असल्याचे सांगितले. याचे पुरावे त्यांनी दिले आहेत. सोमय्यांनी ट्वीट करत परबांच्या रिसॉर्टचा फोटो टाकला आहे. कोकणातील बेनामी रिसॉर्ट, काळा पैसा आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात अनिल परब यांच्याविरोधात केंद्र सरकारने तक्रार दाखल केल्याचे सोमय्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची दापोली न्यायालयात ३० मार्च रोजी सुनावणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp CommunityAb Anil Parab ka Number bhi Aayega
Unauthorized, Benami Resort. Use of Non Transparent Money for resort construction. Benami Property
Government of India has filed a complaint in Dapoli court. Hearing scheduled for 30 March @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/6FQAZcSHLl
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 12, 2022