राऊतांच्या गौप्यस्फोटाआधीच सोमय्यांनी उचलले ‘हे’ पाऊल!

कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी तब्बल सोमय्यांची 89 पानांची तक्रार; म्हणाले 'कोरोडोंचा खेळ केला...'

135

मुंबईत आज राजकीय घडामोडींना वेग आला असून, सेना आणि भाजप आमने-सामने आले असून एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. यासह शिवसेना आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत शिवसेना काही मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले जातेय तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या देखील आक्रमक झाले असून त्यांनी एक पाऊल उचलले आहे. मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याविरोधातील आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करा, नाहीत आझाद मैदाना पोलीस ठाण्याच्या विरोधात न्यायालयात तक्रार करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

काय म्हणाले सोमय्या

किरीट सोमय्या यांनी आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात येऊन जम्बो कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी तब्बल 89 पानांची तक्रार दाखल केली. यावेळी अॅड. विवेकानंद गुप्ता त्यांच्यासोबत होते. संजय राऊत यांचे कौटुंबिक पार्टनर सुजीत पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोव्हिड पेशंटच्या जीवाशी खेळून कोरोड रुपयांचा खेळ केला. कंपनी अस्तित्वात नसतानाही बोगस कागदपत्रांद्वारे कंत्राट मिळवले या सर्वांची माहिती पोलिसांना दिली असल्याचे सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.

(हेही वाचा – बापरे! मुंबईत ओमायक्रॉनचा कहर; जाणून घ्या किती टक्के रूग्णांना झाली बाधा)

पोलिसांविरोधात तक्रार करण्याचा इशारा

तक्रार दाखल केल्यानंतर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, जम्बो कोव्हिड सेंटरचे कंत्राट मिळवण्यासाठी बीएमएसवाल्याला एमडी दाखवले. बोगस कागदपत्रांच्या आधारे हे कंत्राट घेतले. कंपनी अस्तित्वात नसतानाही कंत्राट मिळवण्यात आले. तर अर्जच आलेला नसतानाही पालिकेच्या अधिकाऱ्याने कंत्राट दिले. त्यामुळे यांच्याविरोधात फौजदारी करावी, अशी मागणी पोलिसांना केली आहे. पोलिसांना आता या प्रकरणी सात दिवसात एफआयआर दाखल करावा लागेल. नाही तर आझाद मैदान पोलीस ठाण्याविरोधातच आझाद मैदान न्यायालयात तक्रार करू, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.