किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ यादीतील ‘हे’ आहेत नवे ‘डर्टी’ !

152

भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरूवारी एक ट्विट करून ठाकरे सरकारमधील आणि महाविकास आघाडीतील एकूण १२ जणांची यादी शेअर करून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यावर सोमय्यांनी ट्विट करून भविष्यात असेच गौप्यस्फोट होतील, असे संकेत दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारी सोमय्यांनी आणखी एक ट्वीट करून राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडवली आहे. यात ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’च्या यादीत आणखी दोन नाव त्यांनी समाविष्ट केली आहे.

कोणती आहेत ती दोन नावं?

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये ठाकरे सरकारमधील आणि महाविकास आघाडीतील एकूण १२ जणांची यादी उघड केली आहे. त्यामध्ये मंत्री अनिल परब, शिवसेना नेते संजय राऊत, सुजीत पाटकर, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, मंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र वायकर, मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक अशी नावे या यादीत आहेत. यासोबत त्यांनी या डर्टी डझनमध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव कुटुंब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांची दोन घेतली असून या दोन नावांचा विसर पडला असे म्हणून ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.

(हेही वाचा -मोठी बातमी! तपास यंत्रणेच्या रडारवर आता शिवसेनेचा ‘हा’ नेता)

काय म्हणाले होते सोमय्या?

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, “ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे”. त्यामुळे किरीट सोमय्या आज कोणता नवा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

किरीट सोमय्या म्हणाले होते, “मविआचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झालीय. बेनामी रिसॉर्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालीय”.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.