शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही जमिन घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोटीस बजावण्यात आली होती, तर उद्या मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश राऊतांना देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात बंडखोर आमदारांमुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच राऊतांना ईडीचे समन्स बजावल्यानंतर लगेचच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत राऊतांवर निशाणा साधला आहे.
काय केले सोमय्यांनी ट्वीट
गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. ईडीकडून राऊतांना समन्स मिळताच, हिसाब तो देना पडेगा असे म्हणत सोमय्या आणि राऊत यांच्यातील ट्विटवॉर पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमय्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये संजय राऊत साहेब, तुम्ही मला, माझा पत्नीला, माझा मुलगा नीलला, आईला….. जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा…. धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या….परंतु “हिसाब तो देना पडेगा ” असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
(हेही वाचा – ‘मविआ’ सरकारची आणखी एक खेळी, ‘शिंदे गटा’तील मंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप)
संजय राऊत साहेब,
तुम्ही मला, माझा पत्नी ला, माझा मुलगा नील ला, आई ला…..
जेल मध्ये टाकायचे प्रयत्न करा….धमक्या द्या,
हल्ले करा
शिव्या द्या….
परंतु
"हिसाब तो देना पडेगा " @BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 27, 2022
दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठवले आहे. संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ट्वीट केले आहे.
काय केले राऊतांनी केले ट्वीट
“मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या मला अटक करा!” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. यांनी या ट्वीटच्या खाली राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन केले आहे.
Join Our WhatsApp Communityमला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022