शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या प्रकरणात न्यायालयाने समन्स बजावला आहे. न्यायालयाने राऊतांना हे समन्स बजावल्याने त्यांना ६ ऑगस्ट रोजी शिवडी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांवर अब्रू नुकसानीचा दावा केला होता. या प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
काय आहे प्रकरण
किरीट सोमय्या यांच्या पत्नीने मानहानी प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर राऊतांना हे समन्स बजावण्यात आले असून या प्रकरणात ते दोषी आहेत की नाहीत याचा निकाल न्यायालयाला द्यावा लागणार आहे.
(हेही वाचा – इंदोर-अमळनेर MSRTC बस अपघाताबाबत मोदी, शिंदे, फडणवीसांनी व्यक्त केला शोक)
संजय राऊत यांनी मेधा सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर राऊतांना अब्रू नुकसानीचा दावा केला होता. या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात दोन वेळा अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. असेही सांगितले जात आहे की, राऊतांकडे कोणताही पुरावा नसताना मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. त्यानंतर राऊतांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community