राज्यातील राजकारणाचा स्तर कुठेही घसरला नाही, तो चांगलाच आहे, जे बोलतात आहेत, त्यांच्याच राजकारणाचा स्तर घसरला आहे. माध्यमांना फक्त माझ्याच मुलांची भाषा का खटकते? भास्कर जाधवांची भाषा आवडते का? असा पलटवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावर राणे यांनी कडक शब्दांत पलटवार केला आहे. महाराष्ट्राचा स्तर घसरलेला नाही, जे बोलत आहेत त्यांच्याच राजकारणाचा स्तर घसरला आहे. आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे या आपल्या दोन मुलांची भाषा खटकते, तर मग तुम्हाला भास्कर जाधव यांची भाषा आवडते का?, असेही नारायण राणे यांनी म्हटले. शिवसेनेतील फुटीनंतर ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले, तर १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले.
(हेही वाचा पंतप्रधानांची तरुणांना दिवाळी भेट; 75 हजार नवनियुक्तीपत्रे कर्मचा-यांना केली सुपूर्द)
Join Our WhatsApp Community