सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु असून ही यात्रा आता महाराष्ट्रात आहे. या यात्रेबाबत सध्या चर्चा आणि वादही सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी बिरसा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच आक्रमक होत आहे. अशातच भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्यावर आक्रमक होत सडकून टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी याबाबतचे एक ट्विट करून राहुल गांधींना मनोरूग्ण असल्याचे संबोधत सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही, अशा आक्रमक शब्दात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले भातखळकर
“राहुल गांधी हा मनोरुग्ण आहे, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही. त्याला अंदमान पर्व समजणार नाही त्याची उडी थायलँड पर्यंतच. पांढऱ्या पावडरीचा परिणाम दुसरे काय”, असे अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे. पुढे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये असेही म्हटले की, तुरुंगात सिगरेट फुंकण्यापासून बॅडमिंटन खेळण्यापर्यंत सर्व सोयी उपभोगणाऱ्या नेहरुंच्या पणतूला सावरकरांचा त्याग समजवावा तरी कसा? अशा शब्दात आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
(हेही वाचा – वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानाबाबत पोलिसात तक्रार करणार)
राहुल गांधी हा मनोरुग्ण आहे, सावरकर समजण्या इतकी अक्कल या माणसामध्ये नाही. त्याला अंदमान पर्व समजणार नाही त्याची उडी थायलँड पर्यंतच. पांढऱ्या पावडरीचा परिणाम दुसरे काय…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 17, 2022
या भारत जोडो यात्रेदरम्यानचे अनेक राहुल गांधींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यापैकी एका व्हिडिओवर राहुल गांधींबाबत राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. या व्हिडिओवर भातखळकर म्हणाले, ज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत.
Join Our WhatsApp Communityज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत. pic.twitter.com/PWObDa2mb1
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 17, 2022