“मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार!” भाजपच्या अनिल बोंडेंना वाटणारे ‘ते’ मिशीवाले कोण?

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये होणाऱ्या या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्वीट केले असून चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजपमध्ये काँटे की टक्कर असली तरी प्रामुख्याने प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. अशातच अनिल बोंडे यांनी सूचक ट्विट करत निवडणुकीचा जणू निकालच जाहीर केला आहे.

(हेही वाचा – महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, चंद्रकांत पाटलांचा दावा)

बोंडेंना वाटणारे ‘ते’ मिशीवाले कोण?

विधानपरिषदेचे मतदान सुरू होण्यापूर्वी अनिल बोंडे यांनी एक ट्विट केले. काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर. पण मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार, असे ते ट्विटमध्ये म्हटले. या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ घेतले जात आहे. हे ट्विट करत बोंडे यांचा रोख थेट शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे दिसते. यापूर्वी राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही अनिल बोंडे यांनी सांगितलं होतं की, शिवसेनेचा एक संजय जाणार. त्यावेळी निवडणुकीत संजय राऊत आणि संजय पवार हे शिवसेनेचे उमेदवार होते. यापैकी संजय पवारांचा पराभव झाला. तर संजय राऊत अगदी काठावर पास झाले. त्यामुळे आता अनिल बोंडेंच्या या ट्वीटची देखील पुन्हा चर्चा होत आहे.

बोंडेंच्या या ट्विटचा रोष नेमका कोणाकडे?

बोंडे यांच्या या ट्विटमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मिशीवाला मावळा म्हणजे शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांचा बळी दिला जाणार असल्याचे बोंडे यांना सुचित करायचे आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. बोंडेंच्या या ट्विटचा रोष नेमका कोणाकडे? कोणता मिशीवाला मावळा असेल? तो कोणत्या पक्षाचा असेल, पुन्हा एकदा महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का पचवावा लागणार का असे अनेक प्रश्न अनिल बोंडे यांच्या ट्वीटमुळे उपस्थित झाल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here