ग्रामपंचायत निकालावर शेलांरांची प्रतिक्रिया, म्हणाले “शिंदेंचा ‘तो’ निर्णय…”

85

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदा होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालाची उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळाला होती. कारण महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील ही पहिलीच निवडणूक आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालात भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारली आहे.

(हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प वादावर राज ठाकरेंचा हल्लाबोल, स्पष्टचं म्हणाले…)

भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने सर्वाधिक १३८ जागा जिंकल्या आहेत. यासह महाविकास आघाडीच्या पारड्यात १०० जागा आल्या आहेत. या निकालानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शेलार

आम्ही हा विजय नम्रतेने स्विकारतो आणि यापुढे जनतेची सेवा अधिक दुप्पट क्षमतेने करू, हे जनतेला आश्वस्त करतो. एकनाथ शिंदे हे ज्या मुद्यावर शिवसेनेतून बाहेर पडले, तो त्यांचा निर्णय योग्यच असल्याचे पुन्हा एकदा या निकालाने स्पष्ट झाल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. यासह त्यांनी राष्ट्रवादीला देखील टोला लगावला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष काही राज्यस्तरीय पक्ष नसून दोन-अडीच जिल्ह्यांपुरता पक्ष असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, माझी विशेष टिप्पणी आहे की, आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्याने मिळून उठाव केला. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस ही बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवत आहे, हे निवडणुकीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस नंबर दोनचा पक्ष तर उद्धव ठाकरेंची शिवसेना नंबर चारचा पक्ष झाला आहे. हीच भिती आणि हाच आरोप एकनाथ शिंदेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला होता पण त्यावेळी त्यांचे डोळे उघडले नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच शेवटी त्यांनी निवडणुकीच्या निकालात विजयी केल्याबद्दल समस्त जनतेचे आभार देखील मानले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.