महाराष्ट्रात आडनावं बघून कारवाई केली जाते; आशिष शेलार यांचा शिवसेनेवर घणाघात

गेल्या 25 वर्षांत, मुंबईच्या राजकारणात मी सुद्धा आहे पण कधी नागपाडा, मोहम्मद अली रोड, ते तर जाऊ द्या घराजवळचा बेहराम पाडा तिथेही सत्ताधारी महापालिकेकडून बुल्डोजर नेला नाही. महाराष्ट्रात आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत. खरं तर असा भेद सरकारने करु नये. राणे, राणा, कंबोज, राणावत या आडनावांवर महापालिका नोटीस पाठवते आणि कारवाई केली जाते. अरे गेल्या 25 वर्षात कोणी खान, शेख, पठान यांनी अनधिकृत बांधकाम केलं नाही का ? असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

या सरकारची दशा आणि दिशा दोन्ही चुकली

राज्य सरकार जे आडनावं बघून कारवाया करत आहे. तो जाती-धर्म भेद नाही का, ही अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आहे. बेहराम पाडा तुम्हाला दिसत नाही? शाहीन बागवर कारवाई केल्यावर कोल्हेकुई करता. राणे दिसतात शेख आणि पठाण दिसत नाहीत का?  मुंबई महानगरपालिका आडनावं बघून कारवाई करते आहे. हे मुंबईकर बघत आहेत हे लक्षात ठेवा. या सरकारची दशा आणि दिशा दोन्ही चुकली आहे आणि मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांच्या विरोधात चालली आहे, असे आशिष शेलार यावेळी म्हणाले.

( हेही वाचा :NIA कारवाईतून बड्या नेत्यांची नावे समोर येणार; प्रसाद लाड यांच्या दाव्याने खळबळ )

शाहीन बागमध्ये कारवाई होते पण बेहरामपाड्यावर नाही

राज्याचे पोलीस या दाऊद विरुद्धच्या लढाईत एनआयएला मदत करतीलच, पण आम्हाला दिसतयं की राज्याचे पोलीस हनुमान भक्तांना पकडायला निघाले आहेत. हनुमान चालिसा म्हणणा-यांना पोलीस पकडत आहेत आणि केंद्रातील पोलीस दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघाले आहेत. हा फरक आहे. हा फरक राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी सरकराच्या राजकारणातला आहे. फरक इतकाच नाही जहांगिरपूरी आणि शाहिन बागमध्ये बुल्डोजर पाहायला मिळाला, पण दिल्लीच्या महापालिकेत पाहायला मिळालं. गेल्या 25 वर्षांत मुंबई महानगरपालिकेत मात्र असे पाहायला मिळाले नाही, असे म्हणत, आशिष शेलार यांनी शिवसेनेला खोचक सवाल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here