राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा आहे. अशातच उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवतीर्थावर होणार आहे तर शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर या दसरा मेळाव्याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यावर चांगलाच निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. शेलार यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका देखील केल्याचे दिसतेय.
काय केले शेलार यांनी ट्वीट
“काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचे साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!, सगळा गोंधळ घालून बघा घड्याळ कसे नामानिराळे संसार तिघांचा प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले. काय तो भारतजोडो…काय तो पेंग्विन सेनेचा दसरा…शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला? सगळं कसं ok मध्ये आहे.” असे म्हणत आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2022
पुन्हा टोमणे सभा होणार
यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची जी सभा होणार आहे, किंवा यापूर्वी ज्या झाल्यात त्या टोमणे सभा झाल्यात. यामध्ये ते कधी महाराष्ट्राच्या हिताचं काही बोललेच नाही आणि पुन्हा टोमणे सभाच होणार आहे. आता पर्यंतच्या दसरा मेळाव्यातील संभामध्ये केवळ टोमणेच दिसले, टोमणे सभांनी महाराष्ट्राचे भले होणार नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community