२०१७ मध्येच भाजप-राष्ट्रवादीत युतीची झालेली चर्चा! आशिष शेलार यांच्याकडून गौप्यस्फोट  

154
सध्या शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप कसोशीने करत आहे. त्यामुळे भाजप यामध्ये व्हिलन ठरत आहे, अशा परिस्थितीत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला. भाजपला राष्ट्रवादीसोबत युती करायची होती, त्यासाठी २०१७ मध्येच चर्चा झाली होती, असे शेलार म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीची आजही जोरदार चर्चा आहे. त्यावरून भाजपावर टीका केली जात आहे. आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये २०१७ मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली, असा खळबळजनक गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून राज्यात सर्वाधिक राजकीय चर्चा झाली असेल तर ती शिवसेना आणि भाजपाच्या तुटलेल्या युतीची आणि शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनैसर्गिक वाटणाऱ्या अशा आघाडीची. पण यासोबतच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीची देखील जोरदार चर्चा झाली. अजूनही ही चर्चा रंगत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.