Ashish Shelar: भाजपा नेते आशिष शेलार यांचा ट्विटरद्वारे ठाकरेंना खोचक टोला, भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं

205
सामनातील पंतप्रधानांच्या टीकेवरुन Ashish Shelar यांचा राऊतांवर पलटवार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली आहे. यानिमित्त रविवारी शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून उद्धव ठाकरेंवर खोचक टोला लगावला आहे.

आशिष शेलार उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले आहेत की, “शिवतीर्थावर “भारत जोडो न्याय सभेला” जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी श्रीमान राहुल गांधी यांना घेऊन सावरकर स्मारकात जावे…” असं म्हटलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “श्रीमान उद्धव ठाकरे यांना आज हिंदुत्वाशी “न्याय” करण्याची एक उत्तम संधी आलीय…”

(हेही वाचा – Birthday Wishes For Best Friend in marathi: तुमच्या बेस्ट फ्रेंडला अशा द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा)

“शिवतीर्थावर “भारत जोडो न्याय सभेला” जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी श्रीमान राहुल गांधी यांना घेऊन सावरकर स्मारकात जावे… स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करावे… स्मारकात ठेवण्यात आलेला “कोलू” ओढून राहुल गांधी यांना प्रायश्चित्त करण्याची एक संधी आलीय. तुमचं हिंदुत्व, महाराष्ट्र प्रेम, मराठीपण सिद्ध करण्यासाठी आलेली संधी तुम्ही घालवलीत… तर आज महाराष्ट्र तुमच्या “भगव्या” शालीचा रंग बदला यावर शिक्कामोर्तब करेल!” असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, एम.के. स्टॅलिन आणि अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत. यादरम्यान भाजपाने निशाणा साधला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.