गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या माध्यमातून राज्यातील अनेक नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आता ईडीची कारवाई ही पवार कुटुंबाच्या दारात धडकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार संचालकपदी असलेल्या एका कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून, त्याबाबत ईडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. यावरुन आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
रोहित पवार हे कधीकाळी ग्रीन एकर या कंपनीचे संचालक होते. ही कंपनी आता ईडीच्या रडारवर आली आहे. यावरुन आता कंबोज यांनी खोचक ट्वीट करत रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज यांचे ट्वीट
भारताच्या जेफ बेजोसना भेटा. 2006 मध्ये या 21 वर्षीय गबरू जवानाने ग्रीन एकर्स रिसॉर्ट्सच्या माध्यमातून प्लास्टिक,हिरे,सोने,बिल्डर,एक्सपोर्ट-इम्पोर्ट,दारू ते चड्डी बनवण्याचे स्टार्ट अप सुरू केले. त्यामुळे गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला माझी विनंती आहे की यांचे नाव तुम्ही रेकॉर्डवर घ्या, अशा शब्दांत ट्वीट करत मोहित कंबोज यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मिलिए भारत के #JeffBezos से- 2006 में 21 साल के इस गबरू जवान ने Green Acres Resorts के तहत 200 तरह के अलग अलग- प्लास्टिक,हीरा,गोल्ड,बिल्डर,इक्स्पॉर्ट,इंपोर्ट,दारू से चड्डी तक का धंधा करने वाला #StartUp शुरू किया।गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकर्ड से विनती है कि उनका नाम रेकर्ड में डालें
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
साखर कारखान्यात भ्रष्टाचार
या गबरू जवानाच्या बिझनेस मॉडेलमुळे महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेला 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. याच बँकेमार्फत एका साखर कारखान्याला कोट्यवधींचे कर्ज देण्यात आले. हा कारखाना नंतर गबरू जवानाच्या बारामती अॅग्रोने फक्त 50 कोटींमध्ये खरेदी केला. याच साखर कारखान्याने नंतर 150 कोटी रुपयांचे कर्ज घेतले, असेही कंबोज यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.
Join Our WhatsApp Communityइसी शुगर फ़ैक्टरी ने फिर 150 crore का लोन ले लिया।
HDIL – PMC Bank – Patra Wala Chawl की कितनी शक्कर खायी है गबरू जवान ने यह भी जल्द पता चले गा !
ग़ज़ब का business model है भाई इस गबरू जवान का !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022