राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसांच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी फारूक अब्दुल्ला यांच्या भेटीसंदर्भात माहिती दिली. फारूक अब्दुला आता मला भेटले तेव्हा त्यांनी अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखे लढ असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
काय आहे भातखळकरांचे ट्वीट
“बाळासाहेब आणि फारुक अब्दुल्ला यांची मैत्री होती… उध्दव ठाकरे, अब्दुल्ला दिवाळी दसरा मातोश्रीतच साजरा करायचे असेही सांगून टाकायचे”, असं ट्विट अतुळ भातखळकर यांनी केले.
बाळासाहेब आणि फारुक अब्दुल्ला यांची मैत्री होती… उध्दव ठाकरे
अब्दुल्ला दिवाळी दसरा मातोश्रीतच साजरा करायचे असेही सांगून टाकायचे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 14, 2022
उद्धव ठाकरेंना फारूक अब्दुलांचा सल्ला
उद्धव ठाकरेंनी काल, गुरूवारी छगन भुजबळांच्या वाढदिवसांच्या कार्यक्रमात भाषण केले. यावेळी त्यांनी फारुक अब्दुल्लांच्या भेटीबाबत माहिती दिली. फारुक अब्दुल्ला आणि माझी बऱ्याच दिवसांनी भेट झाली. यामागील दोन महत्त्वाची कारण देताना त्यांनी अब्दुल्लांचे वय झाले आहे, असं सांगतानाच दुसरं कारण हे महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर फार दूर आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच फारुक अब्दुल्ला आता मला भेटले तेव्हा त्यांनी अजिबात घाबरु नकोस. लढ वडिलांसारखा लढ, असे सांगितले, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
Join Our WhatsApp Community