शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून ४० आमदार फोडून महाराष्ट्राच्या बाहेर पडले. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ अगदी चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे. त्यामुळे आधीच महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आले. त्यातच राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला. मात्र बहुमत प्रस्तावाच्या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलीच भाजपाचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ‘सत्ता गेल्यावर शिवसैनिक आठवले, महाराष्ट्राचे डोळे पाणावले, अडीच वर्षे सुडाचे राजकारण करणारे, सुसंस्कृतपणाची भाषा बोलू लागले, कोर्टाच्या दणक्यानंतर, राजीनामा देऊ लागले, असे म्हटले.
तर भातखळकर यांनी ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ‘सुडपतीं “चा निकाल लागला आहे. सूडाच्या कारवाया, विरोधकांना दडपण्यासाठी झालेला पोलिसांचा वापर, अकार्यक्षम कारभार, अहंकारापोटी घेतलेले आडमुठे निर्णय, वसुली, भ्रष्टाचार यातून राज्याच्या जनतेची सुटका होणार याचे संकेत मिळाले आहेत’, असेही ट्विट भातखळकर यांनी केले.
हारी बाजी को जितना
जीसे आता है
वो देवेंद्र ही दोस्तों
कहलाता है…पुन्हा येणार, येणारच…@Dev_Fadnavis pic.twitter.com/Mdfzm1xzBk
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2022
(हेही वाचा उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाला ‘जय महाराष्ट्र!’ राजीनामा देण्याची घोषणा)
तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत, न्याय देवता का सन्मान होगा!, फायर टेस्ट fire test, अग्निपरीक्षा की घडी हैं, ये दीन भी निकल जायंगे.., जय महाराष्ट्र!, असे म्हटले.
न्याय देवता का सन्मान होगा!
🔥 फायर टेस्ट fire test
अग्नीपरिक्षा की घडी हैं.
ये दीन भी निकल जायंगे..
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/OPNyKTWV0O— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
तर ‘मुख्यमंत्री अत्यंत gracefullyपायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!’, असेही म्हटले.
Join Our WhatsApp Communityमुख्यमंत्री अत्यंत gracefully
पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.
लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ.
पण बाळासाहेबांची शिवसेना
धगधगत ठेऊ! pic.twitter.com/smK6e3GKHa— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022