कसब्यातील पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस; म्हणाले…

151

भाजपच्या बालेकिल्ल्या असलेला कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला चांगलीच धुळ चारली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना तब्बल ११ हजार ४० मतांना पराभूत केले. या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला. गेल्या ३० वर्षांपासून एकहाती असणारी कसबा पेठेतील सत्ता महाविकास आघाडीने मिळवली. त्यामुळे हा भाजपचा मोठा पराभव असल्याचे बोलले जात आहे. अशातच ही हार आम्ही मान्य करतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला आहे.

पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शांत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बूस्ट करण्याचं काम चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ‘खचून जाऊ नका, नव्या जोमाने कामाला लागा,’ असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना रविवारी दिला आहे.

दरम्यान या पोटनिवडणुकीत भाजपचे ‘डिसिझन मेकर’ नेते चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, कसब्यातील अपयशामुळे पाटील यांना नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर आता कसबा मतदारसंघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर आले आहे.

(हेही वाचा – नवनीत राणा यांनी मेळघाटात आदिवासी गादली नृत्यावर धरला ठेका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.