By Election 2023: कसबा पेठेसह चिंचवडमधून भाजपकडून कोणता उमेदवार लढणार? सांगितलं चंद्रकांत पाटलांनी

162

पुण्यातील कसबा पेठे आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारी होणार आहे. निवडणुक आयोगाने यासंदर्भातील पत्रक जारी केलं आहे. या पोटनिवडणूकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. यादरम्यान भाजपकडून या दोन्ही पोटनिवडणुकीत कोणते उमेदवार रिंगणात उतरणार यावर पुण्याचे पालकमंत्री तथा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपासून कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं होतं. त्यामुळे कसबा पेठ आणि चिंचवड जागा रिक्त झाल्या आणि काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या दोन्ही जागेवरील आमदार हे भाजपचे होते. त्यामुळे भाजपकडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यालाच संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

कसबा पेठे आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यायची अशी स्थिती भाजपकडून निर्माण केली जात आहे. तसेच दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनाही भेटणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचा – शिंदे गटाचे बांगर यांची प्राचार्यांना मारहाण; देवेंद्र फडणवीस म्हणाले,…योग्य कारवाई करू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.