केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ या सैन्य भरती योजनेविरूद्ध देशभरात हिंसक वातावरण सुरू आहेत. आंदोलन करणारे हे सामान्य नागरिक असून त्यांना विरोधकांकडून भडकवण्यात येत आहे. युवकांनो हे थेट आंदोलन करून अनेक केसेस तुम्ही तुमच्या नावावर दाखल करून घेत आहात. केसेस तुमच्या नावावर असतील तर कुठेही तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाही, ही धमकी नाही तर वस्तुस्थिती आहे, असा इशारा देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या तरूणांना आवाहन केले आहे.
(हेही वाचा – Agnipath Scheme: केंद्रीय गृहमंत्रालयाचा अग्निवीरांसाठी आणखी एक मोठा निर्णय)
योजनेच्या पार्श्वभूमीवर काही सूचना किंवा त्रुटी असल्या तर त्या दुरूस्त केल्या जातील. मात्र काहीही मागण्या न मांडता थेट आंदोलन करणं, रेल्वे पेटवणं हे चुकीचे आहे, असे मत देखील चंद्रकांत पाटलांनी नोंदवलं.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
आंदोलनं अनेक होतात. पण काहीही मागण्या पुढे न करता थेट रेल्वे जाळण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. याचा अर्थ सामान्य युवक हे धाडस करत नाही. यातून युवकांच्या नावावर केसेस दाखल होतील. आणि त्या दाखल झाल्या तर त्यांचे नोकरीचे सर्व मार्गच बंद होतील. त्यामुळे आंदोलनातील हा सामान्य तरूण नाही. त्यामुळे अग्नीपथ योजना काय आहे, हे आधी युवकांनी समजून घ्यावे. ती मान्य नसेल तर शांत मार्गाने चर्चा करावी. आंदोलनाच्या मार्गाने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात. आंदोलनामुळे तुमच्यावर केसेस दाखल होतील, कोणतीही नोकरी मिळणार नाही, मी भिती दाखवत नाही, मीही चळवळीत काम केले आहे, असे शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Join Our WhatsApp Community