उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत केलेल्या युतीवर प्रतिक्रिया देताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. सत्तेसाठी ते ओवेसी यांच्यासोबतही युती करतील. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही निर्णयाने राज्यातील सरकारला फरक पडत नाही. त्यांच्या या युतीचा काही फायदाही त्यांना होणार नाही. भीमसेना, म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नसून फक्त एक गट आहे, अशी टीकाही बावनुकुळे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या युतीमुळे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे येत्या काळात काही कार्यकर्ते त्यांची साथ सोडणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, आम्ही लढत असलेल्या चारही जागा आम्ही जिंकू, कोकणात आम्ही मुसंडी मारली आहे. तर मराठवाडा, अमरावती आणि नागपूर येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकची जागा अपक्ष उमेदवारांची आहे. नाशिकबद्दल पक्ष स्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच, काॅंग्रेसमधून निलंबित सत्यजित तांबे यांनी भाजपकडे अजूनही समर्थन मागितले नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा: मोठा गौप्यस्फोट! कोणत्याही परिस्थितीत फडणवीसांना जेलमध्ये टाका, मविआ सरकारने दिले होते आदेश )
भाजपची साथ सोडली आणि ठाकरेंना उतरळी कळा लागली
उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली त्याचवेळी त्यांचे अध:पतन झाले. बाळासाहेबांच्या नावाने मते घेतली, मात्र अडीच वर्षात तैलचित्र लावले नाही, त्यांची संकुचित वृत्ती आहे, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिवसेनेची स्थापन करताना बाळासाहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. बाळासाहेबांनी त्याचवेळी सांगितले होते की पक्षाला कुलूप लावेन, पण काॅंग्रेससोबत जाणार नाही. काॅंग्रेसकडून वारंवार सावरकर यांना अपमान करण्यात येत असतानाही, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन बसले. अडीच वर्षे तुम्ही सत्तेचा उपभोगही घेतला, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community