Chandrashekhar Bawankule : धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं ठाकरे, पवारांना टोला

आरक्षण दिल्यामुळे आता लोकसभेत आणि विधानसभेतही महिला शक्ती दिसणार आहे

106
Chandrashekhar Bawankule : धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं शरद पवारांसह ठाकरे, पटोलेंना चॅलेंज
Chandrashekhar Bawankule : धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं शरद पवारांसह ठाकरे, पटोलेंना चॅलेंज

हिंदू धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना मान्य आहे काय?, तुमच्यात धमक असेल तर ही आघाडी तोडा, नाहीतर जनताच तुमचा बदला घेईल’, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
हातकणंगले लोकसभा प्रवास अंतर्गत शुक्रवारी (६ सप्टेंबर) येथे ‘संपर्क ते समर्थन’ अभियान पार पडले. त्याचा समारोप महात्मा गांधी पुतळा चौकात झाला. यावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत  नरेंद्र मोदी हे सर्व रेकार्ड तोडून पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

(हेही वाचा : Governor Ramesh Bais : युवकांमधील वाढते हृदयविकार चिंताजनक : राज्यपाल रमेश बैस)

आजच्या अभियानामध्ये ९३४ जणांना भेटलो. त्यातील ९३२ जणांनी मोदींना समर्थन दिले. तर एकाने राहुल गांधींचे आणि दुसऱ्याने प्रकाश आंबेडकर यांना समर्थन दर्शविले. त्यामुळे ९८ टक्के नागरिकांना पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान व्हावेत, असे वाटते. मोदींच्या नेतृत्वाखाली महिलांना मोठा सन्मान मिळाला आहे. आरक्षण दिल्यामुळे आता लोकसभेत आणि विधानसभेतही महिला शक्ती दिसणार आहे.याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक- निंबाळकर, अशोक माने, अशोक स्वामी, डॉ. संजय पाटील, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, शहराध्यक्ष अमृत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.