थोरातांना भाजपात प्रवेश देणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

151

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत असलेल्या वादामुळे थोरांत यांनी राजीनामा दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण आता दिल्ली हायकमांड थोरांताच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बाळासाहेब थोरातांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपात कोणालाही यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करतो.

पुढे बावनकुळे म्हणाले की, ‘आमचा राजकीय पक्ष असून पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा इतर कोणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर आम्ही त्यांचा मान-सन्मान ठेवून त्यांना प्रवेश देत असतो. पण थोरात भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही. कारण थोरातांच्या रक्तात काँग्रेस आहे. त्यांचे काँग्रेस वाढविण्यासाठी खूप मोठे योगदान आहे. ज्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी काँग्रेसला सावरले होते.’

(हेही वाचा – Chinchwad by-Election: चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; राहुल कलाटे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.