‘असल्या पत्रकारांना बोलवत जाऊ नका’, राठोडांबाबत विचारताच चित्रा वाघ पत्रकारांवर कडाडल्या

97

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करणा-या चित्रा वाघ यांनी आपण राठोड हा विषय संपवूया असे म्हटले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राठोड यांच्याबाबत चित्रा वाघ यांनी केलेल्या विधानावरुन पत्रकारांनी त्यांना विचारले असता,चित्रा वाघ या चांगल्याच संतापल्या.

सुपारी घेऊन पत्रकार परिषदेला येणा-या पत्रकारांना बोलवत जाऊ नका, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पत्रकारांचा समाचार घेतला आहे.

चित्रा वाघ संतापल्या

भाजप प्रदेश महिला मोर्च्याचा पदभार स्वीकारल्यानंतर चित्रा वाघ या विदर्भ दौ-यावर आहेत. त्यावेळी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. संजय राठोड हा विषय आता आपण संपवूया असं तुम्ही म्हणालात, मग महाविकास आघाडीमध्ये तुम्ही राठोडांवर केलेले आरोप हे केवळ राजकीय हेतून केले का, असा प्रश्न पत्रकाराने चित्रा वाघ यांना विचारला. त्यावरुन चित्रा वाघ यांनी संतापून पत्रकाराची खरडपट्टीच काढली.

(हेही वाचाः ‘संजय राठोड हा विषय आता आपण थांबवूया’, चित्रा वाघ यांचे मोठे विधान)

असल्या पत्रकारांना बोलावू नका

मला हे प्रश्न विचारायला तुम्ही न्यायालय आहात की न्यायाधीश?,मला जे काही करायचं आहे ती मी पाहीन. माझी राठोडांच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका, असे चित्रा वाघ यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. सुपारी घेऊन इथे प्रश्न वाचारायला येणा-या असल्या पत्रकारांना पुन्हा बोलावत जाऊ नका, असे म्हणत चित्रा वाघ चांगल्याच कडाडल्या.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

संजय राठोड हा विषय सध्या आपण संपवूया. त्यांच्याविरोधातील माझा न्यायालयीन लढा हा सुरुच राहील. त्यांच्यापेक्षा इतरही मोठे प्रश्न महाराष्ट्रात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच संजय राठोड यांना क्लीन चीट मिळाली आहे. त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील विचारा, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी गुरुवारी दिली होती.

(हेही वाचाः आव्हाड नोटीस घेण्यासाठी गेले आणि पोलिसांनी अटकच केली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.