काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच, आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यानंतर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.
ही कुठली वैचारिक प्रगल्भता?
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवरुन आक्षेप घेणा-या या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन सध्या सुरु असलेल्या वादाचा उल्लेख केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, कोणीतरी सांगितलेला इतिहास ऐकायचा आणि काहीही बोलायचे ही कुठली वैचारिक प्रगल्भता? म्हणे सावरकरांनी कोणा दुस-याकडून स्वत:वर पुस्तक लिहून घेतले. हा रागांचा बेसूर झालेला नवा राग का? असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्वीटमधून उपस्थित केला आहे.
( हेही वाचा: नुसते प्रेम दाखवू नका, सावरकरांना भारतरत्न द्या; राऊतांची सरकारकडे मागणी )
तरी कसे ??
वारसदार हे कुटुंबात जन्म झाल्यानं होत नाही तर विचारांनी असतात, हेच खरं.ज्यांच्या जाज्वल्य देशभक्तीला पुजायला हवं, त्यांची याच महाराष्ट्रात अवहेलना करण्याची हिम्मत कोणी करतंय ? रक्त सळसळत नाही का ? @ShivSena @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @cbawankule
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 17, 2022
या गोष्टीचे मला आश्चर्य वाटते
राहुल गांधींवर खोचक टीक करताना, चित्रा वाघ यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेत उपस्थिती लावणा-या आदित्य ठाकरेंना आणि ठाकरे गटालाही लक्ष्य केले आहे. आश्चर्य तर या गोष्टींचेही वाटते की, सावरकरांचा सतत अपमान करणा-यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार फिरतात तरी कसे? वारसदार हे कुटुंबात जन्म झाल्याने होत नाही तर विचारांनी असतात, हेच खरे, असही चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community