निर्भया निधीची वस्तुस्थिती सांगत, सत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर पलटवार

130

मागच्या दोन दिवसांपासून निर्भया पथकातील वाहनांवरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेली वाहने स्वत:साठी वापरली असल्याची टीका आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी केली. त्यानंतर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सगळी वस्तूस्थिती मांडत महाविकास आघाडी सरकारची पोलखोल केली आहे. यावेळी सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना तुमच्या सुरक्षिततेच्या ताफ्यातील वाहने ही निर्भया पथकातील होती, असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.

निर्भया पथकातील वाहनांचा तपशील देताना, त्यांनी केंद्र सरकारकडून किती वाहने मिळाली आणि निर्भया पथकासाठी त्यातील किती वापरण्यात आली त्याची आकडेवारीच मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, निर्भया पथकातील वाहने  केंद्राकडून मिळाली. मविआचे सरकार असताना, 220 वाहने मिळाली होती. 121 वाहने ही 94 पोलीस स्थानकांना देण्यात आली. तर 99 वाहने मात्र इतर विभागाला वाटण्यात आली. जे लोकप्रतिनीधी निर्भया पथकातील वाहनांवरुन टीका करत आहेत. त्यांच्याच सुरक्षिततेच्या पथकातील वाहनांसाठी निर्भया पथकातील वाहने वापरली होती, हेही टीका करणारे विसरतात, असेही त्या म्हणाल्या.

( हेही वाचा: राष्ट्रीय पक्षाची मान्यता कशी मिळते? त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते? जाणून घ्या… )

तुम्हाला लाज कशी वाटली नाही?

 मविआच्या काळात 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्भया पथकासाठी वाहन खरेदी करण्यासाठीच्या निधीतून 220 वाहने खरेदी करण्यात आली. मात्र त्या वाहनांचे योग्य पद्धतीने वाटप न करता त्या काळातील एकाच मंत्र्यांच्या मतदार संघात काही वाहने देण्यात आली. त्यामुळे आता शिंदे सरकारच्या विरोधात कांगावा का? असा सवालही वाघ यांनी यावेळी उपस्थित केला. ज्या नेत्याकडून टीका केली जात आहे, त्याच नेत्यांच्या ताफ्यामध्ये ही वाहने वापरली होती, मात्र आता ती वाहने काढून घेऊन निर्भया पथकासाठी देण्यात येणार आहेत, असे त्या म्हणाल्या. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवर, सुनिल केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई यांच्या ताफ्यातील व्हीव्हीआयपी ताफ्यासाठीही निर्भया वाहने वापरण्यात आली होती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणारी वाहने स्वत:च्या दावणीला बांधताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असा सवाल त्यांनी मविआतील नेत्यांना त्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.