किशोरीताई, गुजरातच्या पेंग्विनला देता भेट, वरळी स्फोटातील लहानगा आठवला नाही का?

127

किशोरी पेडणेकर स्वत: ५५० किमी प्रवास करत गुजरातला पेंग्विनच्या भेटीला गेल्या, पण वरळी येथे सिलिंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या, लहानग्या बाळासाठी साडे आठ मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात, हेही त्यांनी स्वत:च जाहीरपणे कबूल केले आणि युवराज यासाठी त्यांचं अभिनंदनही करतीलच, असं म्हणतं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

पक्षावरुन पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप

किशोरी पेडणेकरांनी गुजरातमधील आदरातिथ्याची स्तुती केली होती, त्यावर चित्रा वाघ यांनी महापौरांवर खोचक टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, असो…त्यांनी जी गुजरातमध्ये मिळालेल्या आदरातिथ्याची तारीफ केली, ती मुळात आपली हिंदू संस्कृती आहे. पण आपल्याला सध्या सुल्तानशाहीच जवळची वाटत असल्यामुळे, हिंदूच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणं स्वाभाविक आहे. आज सर्व मुंबईकरांना हे तर कळून चुकले आहे की, सत्ताधारी सेना ही फक्त पेंग्वीनसाठी आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते आणि मुंबईकरांच्या दैनंदिन समस्येवर त्यांना काही देणं घेणं नाही.

( हेही वाचा: धक्कादायक! मुली शाळेत जाण्यासाठी उतरतात कोयना धरणात )

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर

सोमवारी महापौरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणता, तर मग शेलार आणि भातखळकरांना गुजरातचे पेंग्विन म्हणायच का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. तसेच त्यांनी तिकडे पेंग्विनची नावं आफ्रिकन असल्याचं म्हटलं. काही जण डोकी फोडू, दंगली करु असं म्हणतात, पण आम्ही मात्र विकासावरच बोलू असही किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.