BJP leader Chitra Wagh: भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंना खोचक सवाल विचारत टीका, हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?

203
बारामतीच्या मोठ्या ताईंना दीड हजाराचे मोल कळणार नाही; Chitra Wagh यांचा घणाघात

भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली आहे. रविवारी शिवाजी पार्कवर यानिमित्त जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहून देशाला एकतेचा संदेश देणार आहेत. यादरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करून खोचक प्रश्न विचारला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरूनही याविषयीचं ट्विट केलं आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ प्रश्न विचारताना उद्धव ठाकरेंना म्हणाल्या की, ‘अरेच्चा उद्धवजी ! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्ल्य अभिमान?’ असे म्हणत त्यांनी उद्धवजींवर टीका केली आहे तसेच कॉंग्रेसची मुजोरी आणि उबाठाची ‘जी हुजुरी’ हेही राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत पाहायला मिळतंय.

वाघ यांनी ट्विटरवर यांसंदर्भात पोस्ट प्रसिद्ध केली आहे. (BJP leader Chitra Wagh) त्यात त्यांनी म्हटलंय की, ‘अरेच्चा उद्धवजी …!हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान? तुमचं खोटं प्रेम आणि बेगडी अभिमान कॉंग्रेसचरणी लोटांगण घालताना साऱ्या मराठी जनतेने आज पाहिला. राहुल गांधी सगळ्या ऐतिहासिक स्थळांना आणि महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मुंबईभर फिरताहेत, पण दोन स्थळांबद्दल मात्र त्यांना भलतीच अॅलर्जी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती जागणवारं शिवतीर्थ…! कॉंग्रेस वारंवार या महामानवांना अपमानित करूनही उबाठा गटाला लाचारी काही सोडवत नाही. कॉंग्रेसची मुजोरी आणि उबाठाची ‘जी हुजुरी’ हेही राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत पाहायला मिळतंय.’, असंही चित्रा वाघ यांनी आपल्या ट्िवटमध्ये म्हटलं आहे.

कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव हेही उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.