राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक संदेश वादात आला आहे. हा संदेश सुप्रिया सुळेंनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिला आहे. ‘आई-वडिलांनी मला मागच्या वेळेला मतदान केलं नसेल तर २०२४मध्ये मतदान करायला सांगा’, असा सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे. सुप्रिया सुळेंच्या या संदेशाचा व्हिडिओ भाजपचे नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटवर शेअर करत सुप्रिया सुळेंवर काय वेळ आलीये, असं म्हणतं डिवचलं आहे.
सुप्रिया सुळे विद्यार्थ्यांना काय म्हणाल्या?
‘तिथे यशवंतराव चव्हाण सेंटर लिहिलंय बघा. त्या संस्थेमध्ये मी काम करते. तुमचे शिक्षक कसे इथे काम करतात, तसं मी दोन काम करते. मी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नोकरी करते आणि मी तुमची खासदार आहे, ओके. हो का नाही. (मुलं, हो म्हणतात) तुमचे आई-वडील मला मतदान करतात ना? (मुलं पुन्हा हो म्हणतात) कशावरून? तुम्ही विचारलं का? कोणी विचारलं होत घरून निघताना?… आता घरी जाऊन विचारा. जर मागच्या वेळी मतदान केलं नसेल तर २०२४मध्ये करायला सांगा, हे माझं काम करा. असो हा गंमती जमतीचा भाग झाला. पण मी हे सांगण्यासाठी खरंच आलेले नाही, असं सुप्रिया सुळेंनी व्हिडिओच्या शेवटी स्पष्टकीकरण दिलं आहे.
चित्रा वाघ यांचं ट्वीट काय?
‘काय वेळ आलीये..? ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुरड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ सुप्रिया ताईंवर आलीये..? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये,’ असं चित्रा वाघ म्हणाल्या.
काय वेळ आलीये..?
ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ @supriya_sule ताईंवर आलीये..?
याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती..
खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये तर…@CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/SMtrHEBkzk
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 24, 2023
(हेही वाचा – मोठा गौप्यस्फोट! कोणत्याही परिस्थितीत फडणवीसांना जेलमध्ये टाका, मविआ सरकारने दिले होते आदेश)
Join Our WhatsApp Community