देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री? Google च्या गोंधळामुळे नेटिझन्समध्ये चर्चा

168

गेल्या महिन्याभरापासून राज्यात अनपेक्षित राजकीय घटना घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवे सरकार राज्यात स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नाही, तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कारणही तसंच आहे, गुगलवर देवेंद्र फडणवीस सर्च केल्यावर समोर येणारी माहिती चकीत करतेय. कारण फडणवीसांच्या नावाखाली चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचा उल्लेख करण्यात आलेला बघायला मिळतोय. त्यामुळे गुगल गंडलंय, की गुगल नेटिझन्सना गंडवतंय, अशा चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का…?)

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारच असा ठाम विश्वास राज्याला असताना फडणवीसांनी आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत आहोत. तसेच आपण त्यांना बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत त्यांनी केली. शपथविधीची वेळ ठरली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अवघ्या काही मिनिटांमध्ये डाव पलटला. भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आदेश आला आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लागली. यानंतर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मिळाले. मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांची गुगलने एक वेगळीच ओळख करून दिल्याने गुगलने युजर्सना गंडवलं की गुगलच गंडलं? यावर आता चर्चा होताना दिसतेय.

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यामुळे होतेय चर्चा!)

असे सांगितले जात आहे की, गुगलकडून काहीतरी चूक झाल्याने हा प्रकार घडला असावा.  मात्र, या चुकीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. ३० जून रोजी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून अडीच वर्षे काम केले. ठाकरे सरकारला अनेक मुद्द्यांवरून घेरले. विरोधी पक्षनेते होण्यापूर्वी फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री होते. ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत फडणवीसांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.