शिवसेनेचे एक हाती लढवय्ये संजय राऊत १०० हून अधिक दिवसानंतर तुरूंगातून बाहेर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली. राऊत तुरूंगातून बाहेर येताच एकच जल्लोष करण्यात आला. जागो-जागी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, ठाकरे गटातील नेत्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राऊत यांना फोन करून त्यांचं स्वागत केले आहे. मात्र सर्वात लक्ष वेधून घेणारा एक फोन कॉल देखील त्यांना आला होता.
‘या’ बड्या नेत्याने केला राऊतांना फोन
संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्याने राऊत यांना हा फोन करून त्यांची विचारपूर केली आहे. या फोननंतर राऊत भाजपशी हातमिळवणी करणार का…की भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. हा भाजपचा बडा नेता म्हणजे डॉ. सुब्रमण्यम स्वामी. डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणे झाले हे राऊतांनी सांगितलं नाही. मात्र राऊत यांना भाजपच्या नेत्याने फोन केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत.
संजय राऊत बाहेर येताच त्यांनी पहिल्यांनी आज, गुरूवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. तुरूंगातील यातना कोणाच्या वाट्याला येऊ नये, तुरूंगात राहणं फार कठिण असते, असे सांगतानाच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे राऊतांनी सांगितले. इतकेच नाही तर आज, गुरूवारी संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची भेट घेणार आहेत.
Join Our WhatsApp Community