अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ करा; पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

164

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अहमदनगरचे नाव ‘अहिल्या’नगर करण्याची मागणी केली आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या वादानंतर, आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. पडळकर यांनी पत्रातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा -पुतण्याचा मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखले. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बाॅम्बब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लाॅन्च करण्याचा इव्हेंट वाटतो, असे पडळकरांनी म्हटले आहे.

अहमदनगरचे ‘अहिल्या’ नगर करा 

पत्रात पुढे म्हटलेय की, हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुसलमानी राजवटीत हिंदुसंस्कृती, मंदिरे लुटली आणि तोडली जात होती. त्यावेळेस अहिल्यामातेने या हिंदूसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जिर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे, अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

New Project 2022 06 02T113119.763

( हेही वाचा: 1990 चा नरसंहार पुन्हा होणार? काश्मिरी पंडितांना भीती; खोरे सोडण्याचा इशारा )

मुख्यमंत्र्यांना सवाल

तुम्ही आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात, हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटित झालाय, हे लक्षात ठेवा, असे पडळकरांनी पत्रातून म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.