भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’; राज्यातील १८ मतदारसंघ लक्ष्य

135
भाजपाने आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे, त्यासाठी विचारमंथन आणि लक्ष्य ठरवणे सुरु झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात भाजपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील १८ मतदारसंघावर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे त्यांनी ‘मिशन महाराष्ट्र’ची एक प्रकारे घोषणा केली आहे.

काय म्हणाले नड्डा?

आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. मंदीच्या दिवसातही भारत ब्रिटनला मागे टाकून पाचव्या नंबरवर गेला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले.  या मंदीच्या दिवसातही भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आज अमेरिका आणि रशिया संकटातून जात आहेत, पण, भारत अर्थव्यवस्था स्थीर करण्याचा प्रय़त्न करत आहे. भारत स्टीलमध्ये जगात दोन नंबरला आहे.  या सर्व गोष्टी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करत आहोत. चीन, अमेरिकेत अजुनही कोरोना मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेत अजुनही लसीकरण पूर्ण झालेले नाही, युरोपमध्येही तिच परिस्थीती आहे. चीनची अवस्था आपण पाहतो आहे, तेच भारतात २२० कोटी लसीकरण तसेच बुस्टर डोस झाले आहेत, असेही जे.पी.नड्डा म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.