मढमधील स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी भाजपचा आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यावर आरोप

124

मढमधील कथित स्टुडिओप्रकरणी भाजपकडून महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मढमधील स्टुडिओ उभारणीत 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भाजपचा आरोप

मालाडमधील मढ येथे शूटिंग स्टुडिओ उभारमीत सीआरझेड नियमांचं उल्लंघन महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहरचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी मढ येथे सीआरझेड क्षेत्रातील जागेवर अनधिकृतरित्या स्टुडिओ उभारला आहे. पर्यावरण आणि सीआरझेड कायद्यांतर्गत राखीव क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही.

जुलै 2021 मध्ये आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या जागेला भेट दिली होती. या जागेवर शूटिंगचे सेट उभारण्यात आले होते. जुलै 2021 मध्ये या स्टुडिओची मुदत संपली होती, तरी सुद्धा हे स्टुडिओ पाडण्यासाठी कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही, असा आरोप किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांनी केल आहे.

मालकांवर कारवाई करण्याची मागणी

या ठिकाणी स्मशानासाठी परवानगी नाकारत स्टुडिओसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. पण मुदत संपल्यावरही हा स्टुडिओ पाडण्यात आला नाही. तसेच मुंबई महापालिकेला देखील हे बांधकाम अनधिकृत असून ते तोडण्यासंबंधी आमच्याकडून नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस देऊन एक महिना झाला तरी यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महापालिका अधिकारी,जिल्हाधिकारी यांना या स्टुडिओच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.