पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे संजय राऊत यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्यावर टीका करत राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
राऊतांचा मुक्काम लांबणार
संजय राऊत यांची रवानगी नवाब मलिक यांच्या शेजारी आर्थर रोड जेलमध्ये होत आहे. पण आता फक्त पत्राचाळ घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. अजून वसई पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथील पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्स सोबत मिटींग्स, चीन यात्रा या सर्व घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत राऊतांचा मुक्काम लांबणार असे वाटते, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘नुसत्या चक्करा मारतायत पण पाळणा हलत नाही’, उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका)
आता संजय राऊत यांची रवानगी नवाब मलिक यांच्या शेजारी आर्थर रोड जेलमध्ये होत आहे
अजुन तर पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी सुरु झाली आहे. वसई पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्स सोबत मिटींग्स, चीन यात्रा
सर्व घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत मुक्काम लांबणार वाटते pic.twitter.com/cE36FdOEll
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 8, 2022
राऊतांना न्यायालयीन कोठडी
सोमवारी संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. पत्राचाळ पुनर्विकासातील पैशांच्या अनियमिततेप्रकरणी त्यांना सोमवारपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांना सोमवारी न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यानंतर साऱ्यांचे लक्ष संजय राऊतांना ईडी कोठडी की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे होते. गेल्या दोन सुनावणीत संजय राऊत यांना न्यायाधीश देशपांडे यांनी ईडीच्या कोठडीत पाठवले होते. त्यानंतर आता त्यांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.
(हेही वाचाः संजय राऊतांना कोठडीतही शांत बसवेना!)
दरम्यान, राऊत न्यायालयीन कोठडीमध्ये असताना न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना एकीकडे दिलासा मिळाला आहे. पण राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community