राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण 7 ठिकाणी ईडीकडून गुरुवारी सकाळपासून छापेमारी सुरु आहे. तसेच, ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल केला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना, अनिल परब यांना बॅग तयार ठेवा म्हणत, परबांना अटक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब यांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. शेल कंपन्या, पर्यावरण मंत्रालय अशा अनेक ठिकाणी त्यांची चौकशी सुरु आहे. अनिल परब यांचे सहकारी कदम यांच्या घरी सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड मिळाली होती. पंचवीस कोटी रुपयांचा रिसाॅर्ट आहे. आत्ता ठाकरे सरकारला जावे लागणार, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
( हेही वाचा: परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण 7 ठिकाणी ईडीची धाड )
अनिल परब यांनी आता आपली बॅग भरावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. अनिल परब यांच्यावर आता ईडीकडून अटकेची कारवाई होण्याचे संकेतही सोमय्या यांनी दिले आहेत.
Join Our WhatsApp Community